यासाठी काही पैसे भरावे लागतात का?
नाही. कोणत्याही कामासाठी, training किंवा ID साठी SMK कधीच पैसे घेत नाही. कोणी SMK च्या नावाने पैसे मागितले तर ते फसवणूक आहे; लगेच 99750 71730 वर कळवा.
मुलाखत कोण घेते?
शुभ, SMK टीमचे HR मॅनेजर, ऑनलाइन मुलाखत घेतात. तुम्ही लिहून किंवा बोलून उत्तरे देऊ शकता. तुमच्या उत्तरांची प्रणाली तपासणी करते आणि अंतिम निर्णय SMK टीम घेते.
कोणते मोबाईल / computer कौशल्य लागते?
WhatsApp status लावणे, Instagram / Facebook story, mention / tag, reshare, WhatsApp Business, Google Sheet आणि screenshot पाठवणे हे यायला हवे. मुलाखतीत शुभ हे तपासतात आणि एक छोटे practical असते. SMK ला tech-savvy, smart टीम हवी आहे.
मला शेअर बाजाराची माहिती नाही, चालेल का?
हो. Course Partner आणि Telecaller साठी आधी मोफत training मिळते. तुम्ही आधी स्वतः शिका, मग इतरांना सांगा.
किती कमाई होईल?
उत्पन्नाची हमी नाही. Freelance partner ला तुम्ही close केलेल्या कोर्स admission वर commission आणि financial product referral वर incentive मिळतो; हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. पगारी कामाच्या अटी offer letter मध्ये लेखी मिळतात.
पैसे कसे आणि कधी मिळतात?
तुमच्या SMK ID वर प्रत्येक admission आणि commission ची नोंद app मध्ये दिसते. दर महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या बँक खात्यात, लागू TDS वजा करून payout.
मी नोकरी / शिक्षण करत असताना हे करू शकतो का?
हो. Freelance Course Partner चे काम तुमच्या वेळेनुसार करता येते. फक्त तुमच्या नोकरीच्या नियमांचे पालन तुमची जबाबदारी.
मी शेअर टिप्स किंवा गुंतवणूक सल्ला देऊ शकतो का?
नाही. SMK फक्त शिक्षण देते. कोणत्याही टीम सदस्याने टिप्स, परताव्याची हमी किंवा गुंतवणूक सल्ला देऊ नये; हा करारातील महत्त्वाचा नियम आहे.